scorecardresearch

Premium

जावा बेटाला भूकंपाचा धक्का

भूकंपाचे केंद्र मलंग जिल्ह्य़ाच्या सुंबरपुकुंग शहराच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर आणि ८२ किलोमीटर खोलीवर होते.

जावा बेटाला भूकंपाचा धक्का

इंडोनेशियाच्या जावा या मुख्य बेटावर आलेल्या भूकंपात किमान सहा जण  ठार झाले आणि अनेक इमारतींचे नुकसान झाले. बाली या प्रमुख पर्यटनस्थळालाही भूकंपाचा धक्का बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

रिश्टर स्केलवर ६ तीव्रतेच्या या भूकंपाने स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता या बेटाच्या दक्षिण किनाऱ्याला धडक दिल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने सांगितले. भूकंपाचे केंद्र मलंग जिल्ह्य़ाच्या सुंबरपुकुंग शहराच्या दक्षिणेला ४५ किलोमीटर अंतरावर आणि ८२ किलोमीटर खोलीवर होते.

heavy rainfall in ratnagiri district due to low pressure belt
कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
rain in navi mumbai nerul recorded 19 80 mm rainfal
नेरूळमध्ये अर्ध्या तासात १९.८० मिमी पावसाची नोंद; सायंकाळी बेलापूर नेरुळला पावसाने झोडपले
rail line doubling project, pune miraj rail line doubling project, western railways, pune miraj railway line double
पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेचा वाढणार वेग! पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग
earthquake, Vigilance in the palghar district , earthquake shock,
पालघर: भूकंपाच्या धक्क्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सतर्कता

समुद्राखाली झालेल्या भूकंपामध्ये सुनामी आणण्याची क्षमता नसल्याचे इंडोनेशियाच्या भूकंप व सुनामी केंद्राचे प्रमुख रहमत त्रियोनो यांनी एका निवेदनात सांगितले. मात्र, भूस्खलन घडवून आणू शकणाऱ्या मातीच्या किंवा दगडांच्या उतारापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Earthquake shakes shocked island java akp

First published on: 11-04-2021 at 00:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×