श्रीलंकेतील मानवी हक्क स्थिती दयनीय असल्याचा करण्यात येत असलेला आरोप अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी सपशेल फेटाळला आहे. देशाच्या विकासासाठी स्थिर आणि शक्तिशाली सरकार गरजेचे असून पाश्चिमात्य देश अनभिज्ञतेतून आपल्यावर टीका करीत आहेत, असेही राजपक्षे यांनी नमूद केले आहे.
देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. स्थिर सरकार हा देशासाठी शक्तिशाली पाठिंबा असतो. त्यामुळे जोमाने पुढे जाण्यासाठी जनतेच्या पूर्ण पाठिंब्यावरील शक्तिशाली सरकार हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असे मत राजपक्षे यांनी चीनच्या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
आमच्याकडे अंगुलीनिर्देश करणे, टीका करणे हे पाश्चिमात्य देशांना सहज शक्य आहे. मात्र त्या देशांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही, असे खेदाने म्हणावे लागेल, असेही राजपक्षे म्हणाले. एलटीटीईचा सफाया झाल्यानंतरही मानव हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या टीकेबद्दल राजपक्षे बोलत होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2013 रोजी प्रकाशित
श्रीलंकेवर टीका करणे पाश्चिमात्य देशांसाठी सोपी बाब – महिंद्रा राजपक्षे
श्रीलंकेतील मानवी हक्क स्थिती दयनीय असल्याचा करण्यात येत असलेला आरोप अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी सपशेल

First published on: 15-09-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy for western countries to talk criticise shri lanka rajapaksa