लंडन : भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य मेघनाद देसाई यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. देसाई यांच्यावर गुरुग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती त्यांच्या लंडनमधील कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या सूत्रांनी दिली.

मेघनाद देसाई यांचा जन्म १९४०मध्ये गुजरातमध्ये झाला होता. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमध्ये १९६५ ते २००३ इतका दीर्घकाळ अर्थशास्त्राचे अध्यापन केले. त्यांनी १९७१मध्ये मजूर पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आणि जून १९९१मध्ये ते ब्रिटिश संसंदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले.

मेघनाद देसाई यांना २००८मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत आणि ब्रिटनदरम्यानचे संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील शोकसंदेशात लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.