इक्वेडोरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या ७.८ रिश्टर तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या ६५४ वर गेली असून आणखी ५८ लोक बेपत्ता असल्याचे तेथील सरकारने सांगितले आहे.

प्रामुख्याने किनारी भागातील शहरे जमीनदोस्त करणाऱ्या या भूकंपानंतर ११३ लोकांना वाचवण्यात आले असून सध्या २५ हजार लोक तात्पुरत्या आश्रयस्थानी राहात आहेत, अशी माहिती जोखीम व्यवस्थापन सचिवालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

२००७ साली पेरूमध्ये झालेल्या भूकंपबळींपेक्षा इक्वेडोरच्या भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या जास्त झाली आहे. १९९९ साली कोलंबियात एक हजाराहून अधिक बळी घेणाऱ्या भूकंपानंतर दक्षिण अमेरिकेतील हा सगळ्यात विनाशकारी भूकंप आहे.