ED Files Money Laundering Case : ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. कारण भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. टी. रामाराव यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारांचा गुन्हा ईडीने दाखल केला आहे. त्यामुळे के. टी. रामाराव यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. बीआरएसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी हा दावा केला आहे की रेवंथ रेड्डी यांच्या सरकारमध्ये के. टी. रामाराव यांच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले होते.

के.टी. रामाराव यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

हैदराबादच्या फॉर्म्युला ई रेससाठी जे पैसे भरण्यात आले त्यामध्ये रामाराव यांनी आर्थिक अफरातफर केली असा आरोप ईडीने केला आहे. याच प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बीआरएसच्या आमदार कविता कलवकुंतला आणि इतर नेत्यांनी शुक्रवारी तेलंगणा विधान परिषदेत के.टी. रामाराव यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. आमदार महमूद अली म्हणाले की रेवंथ रेड्डींनी जाणीवपूर्वक हे सगळे खोटे आरोप रामाराव यांच्याविरोधात केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कविता कलवकुंता यांनी काय म्हटलं आहे?

आमदार कविता कलवकुंतला म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाने के.टी. रामाराव यांना खोट्या प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न केला. काहीही कारण नसताना त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले. हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. फॉर्म्युला ई रेसिंगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जातं आहे मात्र असा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही.” असंही कलवकुंतला यांनी म्हटलं आहे. “आमचे नेते के.टी.रामाराव यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. या सरकारला या विषयावर चर्चाही करायची नाही. अशी प्रकरणं दाखल करुन बी.आर.एसच्या नेत्यांना अकारण अडकवलं जातं आहे” असंही एका आमदारांने म्हटलं आहे.