इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांची पाठ; तब्बल ६३ संस्था बंद होणार

२०१५-१६ पासून दरवर्षी किमान ५० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत

भारतातील अभियांत्रिकी संस्थांमधील एकूण जागांची संख्या एका दशकात सर्वात कमी झाली आहे.

2015-16 पासून काही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद व्हावीत यासाठी अर्ज करत आहेत आणि इतरांमधील क्षमतेत लक्षणीय घट झाल्यामुळे भारतातील अभियांत्रिकी संस्थांमधील एकूण जागांची संख्या एका दशकात सर्वात कमी झाली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या जागांमध्ये घट होऊन त्या २३.२८ लाखांवर आल्या आहेत.

या वर्षामध्ये इंजिनीअरिंगसाठीच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे, तसंच इंजिनीअरिंगच्या अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, असं असूनही शिक्षणक्षेत्रामधल्या एकूण जागांपैकी ८० टक्के जागा या इंजिनीअरींगच्या आहेत.

२०१४-१५ साली तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे साधारण ३२ लाख जागा होत्या. सात वर्षांपूर्वीपासूनच इंजिनीअरींगच्या जागांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक महाविद्यालये बंद पडली. २०१५-१६ पासून दरवर्षी किमान ५० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत आणि आता या वर्षी ६३ महाविद्यालयं बंद पडणार आहेत.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण परिषदेने ५४ नवीन शिक्षणसंस्थांना मान्यता दिली आहे. जर राज्य सरकारला नव्या शिक्षणसंस्था उभारायच्या असतील तर या मागासलेल्या जिल्ह्यांतल्या शिक्षण संस्थांना परवानगी देण्यात आल्याचं परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Engineering seats down to lowest in a decade 63 institutes to shut in 2021 vsk