Europe court holds Russia accountable for downing malaysia airlines flight : युरोपच्या सर्वोच्च मानवाधिकार न्यायालयाने बुधवारी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात मानवा अधिकारांचे उल्लंघन आणि २०१४ मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे विमान एमएच१७ पाडल्याप्रकरणी रशियाला जबाबदार धरले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या दोन्हींसाठी मॉस्कोला जबाबदार ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
द युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्स (ECHR)ने दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये युक्रेन आमि नेदरलँड यांच्या बाजूने निकाल दिल आहे. ज्यामध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे आणि MH17 विमान पाडण्यासाठी जबाबदार असलेल्या फुटीरतावादी बंडखोरांना थेट मदत केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पूर्व युक्रेनमध्ये बोइंग ७७७ या विमानावर रशियन बनावटीचे बक क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. या हल्ल्यात २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये १९६ लोक हे डच नागरिक होते.
या निर्णयानंतर आता पुढे काय?
बऱ्यापैकी हा निर्णय प्रतिकात्मक असला तरी, एकप्रकारे रशियाला अशा प्रकरणांमध्ये जबाबदार धरण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही प्रकरणे रशियाला कौन्सिल ऑफ युरोपमधून काढून टाकण्याच्या आधीची आहेत, त्यामुळे न्यायालयाला या प्रकरणात सुनावणी करता आली.
एमएच १७ विमानातील पीडितांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कोण जबाबदार होतं हे जाणून घेण्याच्या दृष्टीने हे खऱ्या अर्थाने टाकलेले हे एक पाऊल आहे, ” असे मत थॉमस शॅन्समन यांनी एपी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले. त्यांचा १८ वर्षीय मुलगा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला होता.
या न्यायालयाने देलेल्या अशा प्रकारच्या निर्मयानंतर अंमलबजावणीचा अधिकार नसतो, पण यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढतो. रशियाविरुद्ध असे हजारो खटले युरोपियन मानवाधिकार न्यायालयात प्रलंबित आहेत.