आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. काँग्रेस पक्ष लोकसभेची तयार करत असतानाच देशभरात भारतीय जनता पार्टी काँग्रेसला मोठमोठे धक्के देत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आज गुजरातमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा आणि त्यांचे पूत्र संग्रामसिंग राठवा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस आमदार अर्जुन मोधवाडिया यांच्यासह दोन माजी आमदारांनी सोमवारी (४ मार्च) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. आज या तिघांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. अर्जुन मोधवाडिया यांचं पक्षातून बाहेर पडणं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय.

काँग्रेसचे तीन माजी आमदार अर्जुन मोधवाडिया, अंबरीश डेर आणि मुलू भाई कंडोरिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या तिन्ही नेत्यांनी आज (५ मार्च) दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. मोधवाडिया आणि डेर यांनी कालच त्यांच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Leader of Gadhinglaj Appi Patil join Congress with thousands of activists
गडहिंग्लजचे नेते अप्पी पाटील काँग्रेसमध्ये; हजारो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
Rahul Gandhi criticism of BJP as a repeat of the defeat of Shining India this year
‘शायनिंग इंडिया’ची यंदा पुनरावृत्ती, भाजपवर राहुल गांधी यांची टीका; भाजप आघाडीला १८० जागा मिळण्याचे भाकीत

काही दिवसांत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी गुजरात काँग्रेसच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या पत्रकार परिषदेला अर्जुन मोधवाडिया अनुपस्थित होते. त्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच सायंकाळी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आज भाजपात प्रवेश केला. मोधवाडिया म्हणाले, मला काँग्रेसमध्ये गुदमरल्यासारखे होत होतं. मी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर होतो. माझ्यासारख्या व्यक्तीला काँग्रेस सोडण्यासाठी भाग पाडलं जात असेल, तर काँग्रेसने यासंदर्भात विचार करायला हवा.

हे ही वाचा >> “भारत एक राष्ट्र नाही”, ए. राजांचं वक्तव्य; म्हणाले, “भाजपाच्या राम आणि भारतमातेला…”

यापूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (२२ जानेवारी २०२४) उपस्थित न राहण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर अर्जुन मोधवाडिया यांनी टीका केली होती. तसेच त्यांनी या संदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नाराजी मांडणारी पोस्टही केली होती. त्यानंतर काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट करावी, यासाठी काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी मोधवाडिया यांना विनंती केली. परंतु, त्यांनी पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षात त्यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा होती.