अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्टय़ा दुभंगल्याचे स्पष्ट झाले.  आहेत. त्यामुळे निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २२४, तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली होती. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जागतीक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिक राजकीय दृष्ट्या दुभंगल्याचे चित्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये दिसत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले असले तरी काही महत्वाच्या राज्यांमध्ये अद्याप मतमोजणी सुरु असल्याने लढत अधिक रंजक झाली आहे. ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २६४, तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत. त्यामुळेच बायडेन आणि त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला असून बायडेन यांनी विजय टप्प्यात आलेला असतानाच विजयाची औपचारिक घोषणा पूर्ण होण्याआधीच सत्तेत आल्यानंतर ७७ दिवसांमध्ये हवामान बदलविषयक पॅरिस करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होईल असं म्हटलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१७ मधून या करारामधून माघार घेतली होती. याच घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली. याचपार्श्वभूमीवर एबीसी न्यूजने केलेल्या एका ट्विटवर बायडेन यांनी रिप्लाय दिला आहे. “आजच्याच दिवशी ट्रम्प यांच्या सरकारने पॅरिस करारामधून माघार घेतली होती. मात्र पुढील ७७ दिवसांमध्ये बायडेन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका पुन्हा या करारामध्ये सहभागी होईल,” असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

पॅरिस करार आणि ट्रम्प

पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना कळवला. ‘नागरिकांच्या संरक्षणासाठीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडत आहोत,’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. अमेरिकेचे हित लक्षात घेऊन एक करार करण्यात यावा, असे ट्रम्प यांनी म्हटले. जागतिक हवामानातील बदलांच्या आधारे कृती करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी पॅरिस करार करण्यात आला होता.

‘नागरिकांबद्दलची कर्तव्ये लक्षात घेऊन अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडत आहे. अमेरिकेसाठी शिक्षा ठरणाऱ्या कराराचे समर्थन माझ्याकडून केले जाणार नाही,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्याने मोठा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. अमेरिका बाहेर पडल्याने हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर गंभीर परिणाम होतील. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्यानंतरही इतर सर्व देश यासाठी आपला पाठिंबा कायम ठेवतील, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी व्यक्त केली होती. पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर जगभरातून जोरदार टीका झाली होती. ‘पॅरिस करारावर पुन्हा चर्चा होऊ शकत नाही,’ असे फ्रान्स, जर्मनी, इटली यांनी एका संयुक्त निवेदनातून म्हटले आहे. ‘या विषयावर कोणताही दुसरा पर्याय असू शकत नाही. कारण आपल्याकडे वास्तव्यासाठी दुसरी पृथ्वी, दुसरे जग असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही,’ असे फ्रान्सच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेचा वापर केला होता. यावरुन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘मेक अवर प्लॅनेट ग्रेट अगेन’, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exactly 77 days biden administration will rejoin paris climate agreement tweets biden scsg
First published on: 05-11-2020 at 08:49 IST