भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा शनिवारी रात्री उशिरा भाजपकडून करण्यात आली. भाजपने चौथी मतदार यादी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौमधून लोकसभेची निवडणूक लढमणार आहेत. मुरली मनोहर जोशी यांनी मोदी यांच्यासाठी त्यांचा पारंपारीक वाराणसी मतदार संघ सोडला असून, जोशी कामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून यांसंबधीची घोषणा शनिवारी केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आपला वाराणसी मतदारसंघ मोदींसाठी सोडण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, आता यासंबधीचा वाद संपुष्टात आल्याने वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच लखनऊच्या प्रतिष्ठित मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या वाट्याला वाराणसी मतदारसंघ आल्याने मुरली मनोहर जोशी आता कानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. तर उत्तरप्रदेशातील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष कलराज मिश्रा जौनपूर किंवा श्रावस्ती मतदारसंघातून निवडणूकीसाठी उभे राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी उत्तरप्रेदशातील उमेदवारांसह झालेल्या बैठकीनंतर भाजपकडून हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदींचा वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा शनिवारी रात्री उशिरा भाजपकडून करण्यात आली.

First published on: 15-03-2014 at 12:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eyes on up prize narendra modi set for varanasi