फेसबुकला पाच अब्ज डॉलरचा दंड ठोठवण्यात आला आहे. कँब्रिज अॅनालिटिका डेटा स्कॅण्डलला घेऊन फेडरल ट्रेड कमीशन (एफटीसी) ने फेसबुकवर २०१२ च्या कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. या करारानुसार फेसबुकला त्याचा युझर्सचा डेटा परवागीशिवाय थर्ड पार्टीला वापरण्यासाठी देता येणार नव्हता. मात्र फेसबुककडून या करराचा भंग झाल्यामुळे आता फेसबुकला ५ अब्ज डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.

फेडरल ट्रेड कमीशनने फेसबुकवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा तसेच अन्य आरोपही केले आहेत. या आरोपांमध्ये फेसबुक युझर्सना खोटं बोलणे, गोपनियतेचा भंग करणे व सुरक्षेसाठी युजर्सद्वारे दिल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे जाहिरात देणे आदींचा समावेश आहे.

तसेच फेडरल ट्रेड कमीशनचा आरोप आहे की, फेसबुकने युझर्सकडून फेशियल रिकॉग्निशनबाबतही खोटं बोलले आहे. तसेच, फेडरल ट्रेड कमीशनकडून फेसबुकला सांगण्यात आले आहे की, कंपनी प्रत्येक नव्या उत्पादनासाठी आणि सेवेसाठी प्रायव्हसी रिव्ह्यू करेल आणि हा रिव्ह्यू प्रत्येक तीन महिन्यांनी सीईओ आणि थर्ड पार्टी एसेसरला पाठवला जाईल. आता फेडरल ट्रेड कमीशनच्या आदेशानंतर फेसबुकला थर्ड पार्टी डेव्हलपर्स जे फेसबुकचा डेटा वापरतात त्यांना त्यांचा उद्देश जाणुन घ्यावा लागेल आणि यासाठी सर्टिफिकेशनची देखील आवश्यकता असणार आहे.