आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींमध्ये विमानांच्या ‘मेड इन महाराष्ट्र’ स्वप्नाला भरारी मिळाली असून अमोल यादव आणि सरकारमध्ये ३५ हजार कोटींचा करार झाल्याने लवकरच मेड इन महाराष्ट्र विमानांमधून उड्डाण करता येणार आहेत. त्याशिवाय पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आज टाळे ठोकल्याची घटनाही महत्वाच्या घडामोडींपैकी एक ठरली. त्याचबरोबर देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून अनेकांनी ऑनलाइन, आफलाइन कार्यक्रमांच्या माध्यमांतून महाराजांना आदरांजली वाहिली. या महत्वाच्या घडामोडींबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…