इंटरनेटच्या महाजालात सर्वाधिक लोकप्रिय संवादाचे माध्यम म्हणून ओळख असलेल्या ‘फेसबुक’चा आज १२ वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्ताने फेसबुकने आपल्या युझर्ससाठी एक खास भेट देऊ केली आहे. फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करताच ‘हॅप्पी फ्रेंड्स डे’ या नावाने होमपेजवर फेसबुककडून तुमच्या मित्रपरिवारासोबतच्या आठवणी ताज्या करणाऱया छायाचित्रांचा संग्रह करून एक खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. मित्रमैत्रिणींसोबतचे खास क्षण या व्हडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेअर करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
दरम्यान, फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आजचा दिवस फ्रेंड्स-डे म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले आहे. फेसबुक माहित नाही,असा एकही व्यक्ती सापडणार नाही. समाजमाध्यमांत सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांच्या यादीत फेसबुक अव्वल स्थानावर असल्याचा आनंद झकरबर्गने व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2016 रोजी प्रकाशित
हॅप्पी बर्थ डे फेसबुक, १२ व्या वर्धापन दिनी फेसबुककडून अनोखी भेट
फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करताच 'हॅप्पी फ्रेंड्स डे' या नावाने होमपेजवर तुमच्या आठवणी ताज्या करणाऱया छायाचित्रांचा संग्रह
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 04-02-2016 at 11:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook marks its 12th birthday