भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारवाईबाबतची माहिती दिल्याचे समजते. यानंतर बैठकीला सुरुवात झाली. उरी येथे सर्जिकल स्ट्राइकनंतर आज भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या नियोजनातही डोवल यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. जाणून घेऊयात कोण आहेत डोवाल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facts about national security advisor ajit doval
First published on: 26-02-2019 at 12:13 IST