एक एप्रिल निमित्त आज अनेकांची फेका-फेकी, एखाद्याला गंडवून त्याची खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरू असतात. मात्र, सोशल नेटवर्किंग साईट्सवर नेटिझन्सनी ‘एप्रिल फूल डे’ला वेगळेच वळण देऊन #FekuDay, #AAPrilFoolsDay असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आणले आहेत. या हॅशटॅसद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
सत्तेत येण्याआधी मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने अजून पूर्ण झालेली नसल्याने किंबहूना त्याबद्दल आता भाजप नेते ब्र सुद्धा काढत नसल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्यामुळे एक एप्रिल म्हणजे ‘फेकू डे’ म्हणून साजरा केला जातोय. तर, दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत राक्षसी यश मिळवून दिल्यानंतर राजकारणातील घाण ‘झाडू’न टाकण्याचे आश्वासन देणाऱया केजरीवालांच्या ‘आप’मध्येच सध्या वाद सुरू झाल्याचा नेटिझन्स #AAPrilFoolsDay साजरा करून समाचार घेत आहेत.  भगत सिंह क्रांती सेनेने जोरदार पोस्टरबाजी सुरु केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची घोर निराशा केली आहे. त्यामुळे एक एप्रिल हा दिवस केजरीवाल दिवस म्हणून साजरा करत आहोत, अशा आशयाचे पोस्टर दिल्लीत लावण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फेकू डे’ च्या ट्रेंडमध्ये व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर फिरत असलेले मॅसेज-

मित्रांनो, मोदी यांच्या कार्याला, संघर्षाला त्याचबरोबर आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी १ एप्रिल हा ‘जागतिक मोदी दिन’ म्हणून साजरा करायचा आहे. सर्व भारतभर नाही तर जगभर हा मेसेज गेलाच पाहिजे. १ एप्रिल = जागतिक मोदी दिन (Feku Day) हा मेसेज १० ग्रुपमध्ये पाठवा ३० दिवसांत तुमच्या खात्यात १५ लाख जमा होतील नाही केला तर, भूमीअधिग्रहण कायद्या अंतर्गत आपली जमीन अदानी अथवा अंबानीच्या नावे जमा केली जाईल ………..

 

#AAPrilFoolsDay हॅशटॅगवरील काही निवडक ट्विट्स-

More Stories onएक्सTwitter
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fekuday and aaprilfoolsday trending on twitter
First published on: 01-04-2015 at 01:34 IST