मध्यप्रदेशात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीचा खून केला आहे. पतीच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर जखमेचे निशाण आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बीरेंद्र गुर्जर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर, कंचन गुर्जर असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. हे दोघे सिंगरोली जिल्ह्यातील उर्ती गावामधील रहिवाशी होते. २१ फेब्रुवारीला बीरेंद्र गुर्जर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर बीरेंद्रच्या पत्नीने पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात पोलिसांना बीरेंद्र गुर्जर यांच्या पत्नीवर शंका आली. पोलिसांनी कंचन गुर्जर हिला अटक केल्यानंतर खाक्या दाखवला. तेव्हा तपासात कंचनाने धक्कादायक माहिती दिली आहे.

हेही वाचा : ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारचं कनेक्शन असलेले ६० हिप्पो गुजरातमध्ये येणार; कारण वाचून व्हाल थक्क

कंचन गुर्जरने पोलिसांना म्हटलं की, पती रोज दारू पिऊन त्रास देत होता. याच कारणाने पतीचा खून करण्याचं ठरवलं. यानंतर २१ फेब्रुवारीच्या रात्री पतीच्या जेवणात झोपेच्या २० गोळ्या घातल्या. झोपी गेल्यावर पहिल्यांदा कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला. परत गुप्तांगावर हल्ला करत पतीचा खून केला. खून केल्यावर एका कपड्यात मृतदेह गुंडाळून रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. पुरावे मिटवण्यासाठी पतीचे कपडे आणि चप्पल जाळून टाकलं, असं कंचनने पोलिसांना सांगितलं आहे.

हेही वाचा : खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंचन गुर्जर ही बीरेंद्र गुर्जरची पाचवी पत्नी होती. यापूर्वी चार महिलांनी बीरेंद्रच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडलं होतं. कंचनानेही बीरेंद्रच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याचा खून केला आहे.