जमशेदपूरमधील टाटा स्टील फॅक्टरीमध्ये शनिवारी (७ मे) गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात आतापर्यंत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना टाटा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट सकाळी १० वाजून २० मिनिटांनी झाला.
टाटा कंपनीने यानंतर अधिकृत निवेदन जारी केलं. यात त्यांनी म्हटलं, “जमशेदपूर येथे टाटा स्टील फॅक्टरीमधील कोक प्लँटमध्ये स्फोट होऊन आग लागली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. सध्या घटना घडली तो कोक प्लँटमधील बॅटरी ६ हा भाग बंद करण्यात येत आहे.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. स्फोटानंतर घटनास्थळावर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावण्यास सुरुवात केली. यात एक कामगार पडून किरकोळ जखमीही झाला.