पश्चिम आफ्रिकेतील इबोलाची साथ ही एक मुलगा वटवाघळे असलेल्या पोकळ झाडाशी खेळत असताना त्याच्यामध्ये आली व तेथून पसरली असे आता स्पष्ट झाले आहे. आग्नेय गिनीमध्ये एमिली क्वामोने हा त्यानंतर वर्षभर आजारी पडला तो खरेतर इबोलाचा पहिला रुग्ण होता. तो दोन वर्षांचा होता. त्याचा आजार उन्हाळ्यापर्यंत समजला नव्हता.
इबोला विषाणू इतर ठिकाणी वटवाघळांच्या ज्या तपासण्या करण्यात आल्या त्यात दिसून आले नाही. पण या मुलाला तो रिकाम्या झाडाला असलेल्या वटवाघळांपासून झाला असल्याचे स्पष्ट आहे. इबोलामुळे पश्चिम आफ्रिकेत ८००० लोक ठार झाले आहेत.
इबोलाचे मूळ सापडत नसले तरी फळांवर वाढणाऱ्या वटवाघळांमधून, चिंपाझीमधून किंवा छोटय़ा काळविटातून तो पसरला असावा असे सांगितले जाते. आफ्रिकेतील लोक संसर्ग झालेले प्राणी खात होते हे त्याचे एक कारण आहे. ज्या मुलाला पहिल्यांदा इबोलाची लागण झाली तेथील १६९ वटवाघळांची चाचणी घेतली असता त्यात कुठलाही पुरावा सापडला नाही, पण एका पोकळ झाडाला लांब शेपटय़ांची वटवाघळे होती.
हे झाड या मुलाच्या घराजवळ होते. खेडुतांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये या झाडाला आग लागली तेव्हा वटवाघळांचा पाऊस पडला होता. रॉबर्ट कॉख इन्स्टिटय़ूट या बर्लिन येथील संस्थेच्या संशोधकांच्या मते वटवाघळे ही इबोलाची वाहक असतात यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. लायबेरिया सरकारने असे जाहीर केले होते की, इबोलाने मेलेल्या रुग्णांना पुरण्यास जमीन दिली. २५ एकर जमिनीवर इबोला रुग्णांचे दफन करण्यात आले आहे, असे लायबेरियाच्या इबोला बेरियल टीमने म्हटले आहे.
२००० रुग्णांना तेथे पुरण्यात आले आहे. इबोला रुग्णांची प्रेते संसर्गजन्य असतात. खरेतर इबोलाने मरण पावलेल्या रुग्णांच्या प्रेतांचे दहन करणे संयुक्तिक आहे; पण लायबेरियात दफनाची प्रथा आहे. काही कुटुंबांनी गुपचूप रुग्णांचे दफन केले आहे. लायबेरिया, गिनी, सिएरा लिओन येथे या रोगाचा प्रसार झाला होता. यानंतर या प्रदेशातील लोकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.
कारणे आणि दक्षता
*दफनापेक्षा दहन योग्य.
प्रसार वटवाघळातून पण आणखी ’संशोधन गरजेचे.
पश्चिम आफ्रिकेतील लोक मेलेले ’प्राणी खातात हेही एक कारण.
*इबोला रुग्णाचे प्रेतही संसर्गकारक.
*सात हजाराहून अधिक बळी.