अर्थसंकल्पाचे वाचन करीत असताना अर्थमंत्री अरूण जेटली यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पाच मिनिटांचा ब्रेक घेता येईल का, अशी विनंती केली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही परिस्थिती ओळखून लगेचच पाच मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.
अर्थसंकल्पाचे वाचन करीत असताना जेटली यांच्या पाठीत दुखू लागल्याने आणि त्यांना श्वास घेण्यास थोडा त्रास होऊ लागल्याने त्यांनी अध्यक्षांकडे पाच मिनिटांचा ब्रेक घेता येईल का, अशी विचारणा केली. जेटली यांच्या शेजारीच बसलेले राजनाथसिंह आणि सुषमा स्वराज यांना जेटलींना त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अध्यक्षांनीही लगेचच सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्याचे जाहीर केले. पाच मिनिटांनी पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर जेटली यांनी बसूनच अर्थसंकल्पाचे वाचन करण्यास सुरुवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2014 रोजी प्रकाशित
अर्थसंकल्पातही पाच मिनिटांचा ‘ब्रेक’
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही परिस्थिती ओळखून लगेचच पाच मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.

First published on: 10-07-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five minutes break in budget speech