नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एका विमानाला हवेत आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे विमान १५० हून अधिक प्रवाशांना घेऊन दुबाईला जात होतं. या विमानाच्या एका इंजिनला आग लागली. फ्लाय दुबई फ्लाइटने सोमवारी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी उड्डाण केलं होतं.

उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या एका इंजिनमधून ज्वाळा दिसू लागल्या. या विमानात ५० नेपाळी नागरिकांसह १५० हून अधिक प्रवाशी होते, याबाबतचं वृत्त ‘पीटीआय’ने दिलं आहे.

हेही वाचा- आधी वाद घातला मग भारतीय व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघुशंका, अमेरिकन एअरलाइन्समधील प्रकार

‘पीटीआय’ने सुरुवातीला असं वृत्त दिलं होतं की, संबंधित विमान विमानतळावर जबरदस्तीने उतरण्याचा प्रयत्न करत होतं. तसेच अग्निशमन दलाला सतर्क ठेवण्यात आलं होतं. परंतु, नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटलं की, फ्लाय दुबई फ्लाइट सध्या दुबईच्या दिशेनं रवाना झालं आहे. या विमानाचं एक इंजिन कार्यरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फ्लाय दुबई फ्लाइट क्रमांक ५७६ हे विमान त्रिभुवनहून दुबईला जात असून ते सामान्य स्थितीत आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार हे विमान दुबईकडे जात आहे. काठमांडू विमानतळाचं कामकाज नियमितपणे सुरू आहे,” असंही त्या निवेदनात म्हटलं आहे.