केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग चौथ्या दिवशी काही महत्वाच्या घोषणा केल्या. कोळला, खनिज, संरक्षण उत्पादन, हवाई व्यवस्थापन, ऊर्जा वितरण कंपन्या, अवकाश आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. या सुधारणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळेल. उत्पादन आणि रोजगार दोन्ही वाढेल असे त्यांनी सांगितले.

कोळसा क्षेत्रासंबंधी काही महत्वाच्या घोषणा त्यांनी केल्या

– कोळसा क्षेत्रामध्ये सरकार स्पर्धा, पारदर्शकता आणि खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याला चालना देणार आहे. फिक्स म्हणजे ठरलेल्या उत्पन्नाऐवजी उत्पन्न वाटून घेण्याची नवी पद्धत आणली जाईल.

– कोळसा क्षेत्रात विविध संधी वाढवण्यासाठी ५० हजार कोटींची गुंतवणुक सरकारकडून करण्यात येणार आहे.

– २०२३-२४ पर्यंत कोल इंडिया लिमिटेडसाठी १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सीआयएलमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

– कोळसा उद्योगातील सरकारी एकाधिकारशाही हटवणार असून व्यावसायिक खाणकामाला परवानगी देण्यात येईल.

– कोल इंडिया लिमिटेडच्या खाणी खासगी क्षेत्रालाही देणार.