नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यूजीन या दोघांनीही वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरण स्वीकारलं आहे. हे दोघंही प्रदीर्घ काळापासून आजारी होते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने इच्छामरणाचा स्वीकार करत आणि हातात हात घेत जगाचा निरोप घेतला आहे. नेदरलँडच्या एका कायदेशीर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या दोघांचेही मृतदेह शेजारी शेजारीच दफन करण्यात आले आहेत.

ड्राइस एग्त आणि त्यांच्या पत्नीने ५ फेब्रुवारीला घेतला जगाचा निरोप

ड्राइस वेग्त यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं. यूजीन यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की एग्त मला आजही ‘माय गर्ल’ असं म्हणतात.ड्राइस एग्त हे १९७७ ते १९८२ या कालावधीत नेदरलँडचे पंतप्रधान होते. ते ख्रिश्चियन डेमॉक्रेटिक पक्षाचे सदस्य होते. नेदरलँड हा असा देश आहे ज्या देशात २००० मध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणारे नेदरलँडचे नागरिक हे इच्छामरण मागू शकतात. जे खूप आजारी झाले आहेत, ज्यांच्यावर आता उपचार होणंही अशक्य आहे किंवा ज्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होणं कठीण आहे असे लोक इच्छामरण मागू शकतात.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

६८ वर्षांचा दोघांचा संसार

एग्त आणि यूजीन हे ६८ वर्षे एकमेकांबरोबर होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच इच्छामरणाचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ फेब्रुवारी २०२३ ही तारीखही निश्चित केली.एग्त यांना २०१९ मध्ये एका सेमिनारमध्ये भाषण देत असताना ब्रेन हॅमरेज झालं होतं. अनेकदा ते पक्षविरोधी भूमिका घेत त्यामुळे त्यांच्यावर टीका व्हायची. २०१७ मध्ये त्यांनी हा पक्ष सोडला होता. एग्त इस्रायल विरोधी आणि पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक होते. या दोघांना तीन मुलं आहेत.

हे पण वाचा- “आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र!

नेदरलँडमध्ये इच्छामरणाचा कायदा

नेदरलँडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे. ज्यांना इच्छामरण हवं आहे त्यांच्याकडे डॉक्टर येतात. शेवटची प्रक्रिया ही त्या संबंधित व्यक्तीच्या घरीच केली जाते. या वेळी डॉक्टर रुग्णाला एक खास प्रकारचं इंजेक्शन देतात. ज्यानंतर काही मिनिटांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. या प्रकरणात अशीही तरतूद आहे की जर एखाद्याच्या इच्छा मृत्यूवर कुणी प्रश्न उपस्थित केला आणि डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला असल्याचं किंवा हलगर्जीपणा केल्याचं लक्षात आलं तर डॉक्टरांना १२ वर्षांची शिक्षा होऊ शकते. २०२२ मध्ये नेदरलँडमध्ये ८ हजार ५०० लोकांनी इच्छा मरण स्वीकारलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.