माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना आज, बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नवी दिल्लीतील साकेतमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची पुतणी मनिषी तिवारी यांनी ‘एएनआय’ला ही माहिती दिली.

मॅक्स रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, ९१ वर्षीय तिवारी यांना पक्षाघाताला झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. ते बेशुद्ध पडले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांचे पूत्र रोहित यांनी पीटीआयला दिली.