हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कुरुक्षेत्रचे खासदार नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधीच हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा विधानसभेत केली. यावेळी विधानसभेत बोलताना मनोहरलाल खट्टर यांनी पक्ष जी नवी जबाबदारी देईल, ती पार पाडणार असल्याचे सांगितले. मनोहरलाल खट्टर हे २०१४ पासून कर्नाल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.

मनोहरलाल खट्टर हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात मनोहरलाल खट्टर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आठ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी करण्यात यश मिळविले होते. मनोहरलाल खट्टर यांच्याकडे उत्तम संघटक व उत्तम प्रशासक म्हणून पाहिले जाते. आता खट्टर यांना भाजपाचे वरिष्ठ नेते दुसरी मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

हेही वाचा : “हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय”, अजित पवारांचं नाव घेत विजय शिवतारेंचा हल्लाबोल; म्हणाले, “त्यांनी नीच पातळी गाठली!”

मनोहरलाल खट्टर नेमके काय म्हणाले?

मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा विधानसभेत बोलताना आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मी आज कर्नाल विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देत आहे. आता नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे या कर्नाल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारतील. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेल”.

नायब सिंह सैनी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी पार पडली. यावेळी सरकारच्या बाजूने ४९ आमदारांनी मतदान केल्याने त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. या ठरावाआधी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी राज्याच्या विकासाबाबत, राज्यातील राजकीय घडामोडींबाबत जवळपास एक ते दीड तास भाषण केले. त्यानंतर सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी सरकारने बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर विधानसभेत बोलताना मनोहरलाल खट्टर यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.