आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली. मला फरार म्हणू नका. तुमच्यासारख्या लोकांना लाखोवेळा खरेदी करून विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात, अशी धमकीच ललित मोदी यांनी दिली होती. मोदी यांच्या या पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. असे असतानाच आता मोदी यांनी इन्स्टाग्रामार्फतच मुकुल रोहतगी यांची माफी मागितली आहे. मी रागाच्या भरात बोलून गेलो. मी माफी मागतो, असे ललित मोदी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो”, ललित मोदींची मुकुल रोहतगींना धमकी; म्हणाले, “मुंगीसारखं…”

“इन्स्टाग्रामवरील माझ्या पोस्टसंदर्भात मी पुन्हा एकदा विचार केला. मी रागाच्या भरात बोलून गेलो. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. माझ्या आईकडून मला आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या डावपेचांमुळे मी निराश झालेलो आहे. सॅमी आणि माझ्याकडे काही शेअर्स होते. त्याच शेअर्सच्या माध्यमातून आम्ही एका ट्रस्टमध्ये गुंतवणूक केली. हाच ट्रस्ट आता माझ्या आईने बळकावला आहे. माझ्या आईच्या वागण्यामुळे मला तसेच माझ्या परिवाराला खूप त्रास होतोय. त्याचा परिणाम माझ्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर झाला आहे. याच कारणामुळे मी हे सर्व सोडून सर्व अधिकार माझा मुलगा रुचीरकडे दिले आहेत,” असे ललित मोदी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “केशवराव हे फालतू धंदे बंद करा, असेच खोटे बोलत राहिलात तर…” संजय राऊतांचे केशव उपाध्येंना प्रत्युत्तर!

ललित मोदी यांनी मुकूल रोहतगी यांना धमकी देण्यामागचे कारणही सांगितले आहे. “मला तुमचा निषेध नोंदवायचा होता. मला फरार म्हटले जाते. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असताना तुम्ही सहमती दर्शवली. मात्र मी न्यायाधीशांना खरेदी करणे तसेच विकणे याबाबतचे भाष्य करायला नको होते,” असेही ललित मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >> डाव्होसमध्ये महाराष्ट्राला पहिल्याच दिवशी मिळाली ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार

ललित मोदी मुकूल रोहतगींना उद्देशून काय म्हणाले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना धमकी दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “रातोरात्त न्यायाधीशांना विकत घेऊन तुमच्या अशिलाला न्याय देत असाल. परंतु, मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो. तुम्ही तुमच्या अशिलासाठी कितीही लढू शकता, पण माझा उल्लेख ‘मिस्टर मोदी’च कराल. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात. मात्र, तुमचं नशीब आहे, मला मुंग्या आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला चिरडणार नाही. पण, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत तुम्ही माझ्याबद्दल काही बोलल्याचं कळलं, तर मी तुमच्या मागोमाग न्यायालयात येणार. जय हिंद,” अशी धमकी ललित मोदी यांनी दिली होती.