राजस्थानमध्ये पाण्याच्या भांड्याला हता लावल्याने तिसरीत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतल्या शिक्षकानेच या विद्यार्थ्याची हत्या केली. मीरा कुमार यांनी आपल्या वडिलांनाही १०० वर्षांपूर्वी शाळेत पाणी नाकारलं होतं, आणि आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे सांगत संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा कुमार यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. “१०० वर्षांपूर्वी माझे वडील बाबू जगजीवन राम यांना शाळेत सवर्ण हिंदूंसाठी असणाऱ्या भांड्यातून पाणी पिण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यांचा जीव वाचला हा एक चमत्कारच होता”.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

लोकसभेच्या माजी खासदार आणि परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी असणाऱ्या मीरा कुमार यांनी, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही जातव्यवस्था हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचंही म्हटलं आहे.

“आज एका नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याची त्याच कारणासाठी हत्या झाली आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतरही जातव्यवस्था आपला सर्वात मोठा शत्रू आहे,” अशी खंत त्यांनी ट्वीटमध्ये मांडली आहे.

नेमकी घटना काय?

शाळेत वॉटर कंटनेरला हात लावल्याने शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहमदाबादमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. २० ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, पाण्याच्या भांड्याला हात लावल्याने शिक्षकाने बेदम मारहाण केली. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदाही फाटला होता.

“जातव्यवस्थेच्या नावाखाली माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथून त्याला उदयपूरला नेलं. पण तिथेही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अहमदाबादला नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती वडिलांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former lok sabha speaker meira kumar on rajasthan dalit student murder over water sgy
First published on: 16-08-2022 at 14:18 IST