भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा पंकज सिंह यांनी आज शनिवार भारतीय जनता पक्षात(भाजप) प्रवेश केला.
गेल्या काही महिन्यांपासून पंकज सिंह भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात होते. अखेर आज त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात येऊन अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
पंकज सिंह यांच्या प्रवेशामुळे उत्तरप्रदेशातील भाजपची ताकद आणखी बळकट होण्यास मदत होणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. चंद्रशेखर यांचा समाजवादी जनता पक्ष हा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, त्यांची दोन्ही मुले इतर पक्षात सहभागी झाली आहेत.