पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप फेटाळले. ट्रम्प येथील संघराज्य न्यायालयात हजर झाले. त्यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन न्यायदंडाधिकारी मोक्षिला उपाध्याय यांच्या न्यायालयात गुन्हेगारी आरोप मान्य नसल्यासंदर्भात याचिका दाखल केली.

ट्रम्प पुढील वर्षी होत असलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याच्या तयारीत आहेत. वाहनांच्या मोठय़ा ताफ्यासह ते न्यायालयाच्या आवारात पोहोचले. सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायाधीश उपाध्याय यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध निश्चित केलेल्या चार आरोपांबाबत त्यांचे काय म्हणणे आहे? असे ट्रम्प यांना विचारले. त्यावर आपल्या वकिलांच्या घोळक्यात उपस्थित ट्रम्प यांनी आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायाधीशांनी स्पष्ट केले, की त्यांना आता सोडण्यात येईल, मात्र न्यायालय त्यांना जेव्हा बोलावेल तेव्हा ट्रम्प यांना उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची अट त्यांनी मान्य करावी.

NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका

ट्रम्प आता २४ ऑगस्ट रोजी अमेरिकन जिल्हा न्यायाधीश तान्या चुटकन यांच्या न्यायालयात हजर होणार आहेत, परंतु त्यांना प्रत्यक्ष हजेरीतून सूट देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ट्रम्प यांच्या २०२० च्या निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संघराज्य न्यायालयाने चार आरोप निश्चित केले आहेत. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर फौजदारी आरोप निश्चित करण्याची या वर्षांतील ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेच्या विधि विभागाच्या विशेष वकिलाने ४५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावर ‘ग्रँड ज्युरी’द्वारे अनेक महिने सुनावणी झाली. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना पराभूत केल्यानंतर हा निकाल बदलण्याचे प्रयत्न नेमके कसे केले गेले, याबाबत ट्रम्प यांच्या काही निकटवर्तीय सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. ही निवडणूक जिंकल्यानंतर बायडेन यांनी जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली.

आरोप काय?

७७ वर्षीय ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या फसवणुकीचा कट रचणे, साक्षीदारांवर दबाव आणून साक्ष बदलण्याचा प्रयत्न करणे, नागरिकांच्या हक्कांविरुद्ध कट रचणे आणि अधिकृत प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल आरोप निश्चित करण्यात आले आहेत.