‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा – Indonesia Earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; २० जणांचा मृत्यू, ३०० हून अधिक जखमी

अरिज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. तसेच ते WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते.

हेही वाचा – लाथा, कानाखाली अन् नंतर केस पकडून फरफटत नेलं, मोलकरणीला मृत्यू होईपर्यंत छळलं, भारतीय वंशाच्या आजीला ३० वर्षं कारावास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च किंमतीत विकल्या जाणाऱ्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.