Crime News : ओडिशामध्ये शनिवारी दोन अल्पवयीन चुलत बहिणींना लग्नाच्या कार्यक्रमातून बाहेर घेऊन जात त्यांच्यावर सामूहिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ३ जून रोजी लग्नाच्या कार्यक्रमातून या अल्पवयीन मुलांचे अपहरण केले आणि ४ जूनपर्यंत त्यांना बंदी बनवून ठेवले, त्यानंतर त्यांनी पीडितांना एका निर्जन परिसरात सोडून दिले.

पोलिसांनी सांगितले की, पीडिता या ५ जून रोजी स्वत:हून घरी परत आल्या, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात बीएनएस कलम ७० (सामूहिक बलात्कार) आणि बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गु्न्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम राबवण्यात आली आणि चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

पोलिसांनी काय सांगितले?

बेरहमपूरचे एसपी सरवना विवेक एम यांनी सांगितले की, चारही आरोपी सर्व एकाच गावातील आहेत आणि हे सर्वजण राज्य सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अटक करण्यात आली.

“एक पीडिता ही तिच्या आईच्या फोनवरून एका आरोपीच्या संपर्कात होती. तो पीडितांना एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि त्याच्या इतर तीन मित्रांसह दोन दिवस त्यांच्याव सामूहिक बलात्कार केला,” असे एसपी म्हणाले.

पोलिसांनी पीडितांचे जबाब नोंदवले असून आवश्यक समुपदेशनासाठी त्यांना बाल कल्याण समितीकडे पाठवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही प्रकरणाची सखोल चौकशी करू. आम्ही न्यायालयाला खटला जलद गतीने चालवण्याची आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती करू, असेही एसपी म्हणाले.