फ्रान्समध्ये वाईनचा व्यवसाय संकटात सापडला आहे. वाईनची विक्री कमी झाल्याने किमती घसरल्या आहेत. परिणामी युरोपिअन युनियने अतिरिक्त वाईन नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी फ्रान्सला १४०० कोटी रुपये दिले आहेत. तर फ्रान्स सरकारने ही रक्कम १७०० कोटीपर्यंत वाढवली आहे.

फ्रान्समध्ये क्राफ्ट बिअरची लोकप्रियता वाढली आहे. महागाई आणि वाईनचे झालेले अतिरिक्त उत्पादन यामुळे फ्रान्सच्या वाईनवर अधिशेष लावण्यात आला आहे. यामुळे ३४ टक्क्यांनी वाईनची विक्री कमी झाली आहे. ही अतिरिक्त वाइन आता हँड सॅनिटायझर, साफसफाईची उत्पादने आणि परफ्यूम यासारख्या वस्तूंमध्ये वापरली जाणार आहेत. यासाठी फ्रेंच सरकारकडून व्यावसियाकांना १७०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

यामुळे वाईनच्या किमती मर्यादित राहतील. परिणामी वाईन निर्मात्यांना पुन्हा कमाईचे नवे स्त्रोत मिळू शकतील, अशी माहिती कृषी मंत्री मार्क फेसनेऊ यांनी दिली. भविष्याकडे पाहत, ग्राहकांच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा विचार करणे गरजेचे आहे, असंही ते पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरोपियन कमिशनचा जून ते वर्षाचा डेटा असे दर्शवितो की, वाइनचा वापर इटलीमध्ये ७ टक्के, स्पेनमध्ये १० टक्के, फ्रान्समध्ये १५ टक्के, जर्मनीमध्ये २२ टक्के आणि पोर्तुगालमध्ये ३४ टक्के कमी झाला आहे.