Shivsena MP on Kaali poster row: शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी काली या महितीपटाच्या पोस्टरवरुन नाराजी व्यक्त केलीय. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या हाती सिगारेट दाखवण्यात आल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ हिंदू देवतांपुरतेच राखीव ठेवता येणार नाही, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> कालीमातेच्या तोंडात सिगारेट; माहितीपटाचं पोस्टर बघून नेटीझन्स भडकले, कारवाई करण्याची थेट गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी

चतुर्वेदी यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. इतरांच्या धार्मिक भावनांची चिंता करायची आणि दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ हिंदू देवी-देवतांबद्दलच वापरायचं असं होऊ शकत नाही, अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलंय. या पोस्टवरील कालीमातेचा फोटो पाहून माझ्या भावना दुखावल्या आहेत. मान हा सर्वांना समान पद्धतीने दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही चतुर्वेदी यांनी व्यक्त केलीय.

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. याच यादीमध्ये दोन दिवसांपूर्वी काली या माहितीपटाचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लिना मणीमेकल यांच्या या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. मात्र या प्रकरणावरुन कॅनडा सरकारकडे भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर यासंदर्भात दिलगीरी व्यक्त करण्यात आलीय.