Emmanuel Macron and Wife Viral Video : सोशल मीडियाच्या या काळात अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता तर थेट फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या तोंडावर चापट लगावल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पत्नी त्यांच्या तोंडावर चापट मारताना दिसून आल्या आहेत. त्यामुळे या व्हिडीओची मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे ते राजकीय भेटीसाठी आले होते. यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्यांच्या विमानातून खाली उतरत असल्याचं दिसलं. मात्र, विमानातून उतरत असताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या तोंडावर चापट मारल्याचं व्हिडीओत दिसून आलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, झालं असं की, इमॅन्युएल मॅक्रॉन हे विमानातून उतरत असताना ते आधी विमानाच्या दरवाजा जवळ आले. पण तेवढ्याच ब्रिगिट मॅक्रॉन यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या तोंडावर चापट मारल्याचं दिसून आलं. ब्रिगिट मॅक्रॉन यांनी चापट मारली तेव्हा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन हे क्षणभर अस्वस्थ झाल्याचे दिसले, एवढंच नाही तर त्यांनी क्षणभर आपला चेहराही लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्यांनी स्वत:ला सावरत विमानाच्या बाहेर स्वागत करणाऱ्या प्रतिनिधींना हात दाखवत प्रतिसाद दिला.
त्यानंतर पुन्हा विमानाच्या दारामागे जाऊन इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याशी काही क्षण संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर दोघेही एकत्र विमानातून खाली उतरले. त्यानंतर खाली उतरत असताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या हातात हात देण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिगिट मॅक्रॉन यांनी त्यांचा हात नाकारल्याचं व्हिडीओत दिसून आलं.
Shocking moment Macron 'is shoved in the face' by wife Brigitte pic.twitter.com/bzLg3LKkFM
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— 南洋辉叔 Uncle Hui (@alexcmhwee) May 26, 2025
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने काय प्रतिक्रिया दिली?
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीच्या या कृतीवर सोशल मीडियावर चर्चा रंगली. यानंतर अखेर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या एलिसी पॅलेस येथून यावर स्पष्टीकरण देत हा व्हिडीओ एआयचा चमत्कार म्हणून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर काही वेळातच फ्रेंच माध्यमांनी क्लिप खरी असल्याची पुष्टी केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.