अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या उत्तरेकडील बोगद्यात इंधनाच्या टँकरचा भीष स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काबूलच्या उत्तरेस ८० मैलांवर असणाऱ्या सालंग बोगद्यात ही दुर्घटना घडली आहे. १९६० मध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाने आपल्या सोयीसाठी हा बोगदा बांधला होता. हा बोगदा अफगाणिस्तानच्या उत्तर व दक्षिण भागास जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी

परवान प्रांताचे प्रवक्ते सैद हिमातुल्ला शमीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास या बोगद्यात झालेल्या टँकरच्या स्फोटात महिला व मुलांसह किमान १९ जणांचा मृत्यू झाला. काही दुर्घटनाग्रस्त ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप समजू शकलं नाही.

स्थानिक अधिकारी डॉ. अब्दुल्ला अफगाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानच्या रुग्णालयात १४ जण मृतावस्थेत आणण्यात आले. तर २४ जण जखमी आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे प्रवक्ते मोलवी हमीदुल्ला मिसबाह यांनी रविवारी सांगितले की, या स्फोटाने लागलेली आग विझवण्यात आली आहे. बोगदा साफ करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.