डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून मेहुल चोक्सीला जामीन देण्यास नकार

मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केलेला आहे

Mehul Choksi has been denied bail
अँटिग्वामधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जामीन देण्यास डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने चोक्सीला फ्लाइट रिस्कच्या कारणावरून जामीन देण्यास नकार दिला.
बचाव पक्षाच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला की, एक कैरिकॉम नागरिक म्हणून मेहुल चोक्सीला जामीन मिळायला हवा. कारण, कथित अपराध हा जामीनपात्र आहे व त्यावर काही हजार रुपयांचा दंड भरत आहे.

वकिलांनी असा देखील युक्तीवाद केली की, मेहुल चोक्सीची तब्येत ठीक नाही. अशावेळी त्यांनी फ्लाइटचा धोका पत्कारला नाही पाहिजे. अशावेळी जामीनाच दंड आकारून त्यास जामीन दिला जावा. तर, राज्याकडून जामीनाला विरोध केला जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की मेहुल चोक्सी फ्लाइट रिस्कवर आहे आणि इंटरपोलकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. राज्याने जामीन न देण्याची मागणी केली आहे.

अँटिग्वामधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर, मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसंच मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मेहुल चोक्सी याच्या अपहरणाच्या दाव्याची चौकशी

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fugitive diamantaire mehul choksi has been denied bail by the high court in dominica msr

ताज्या बातम्या