बारी (इटली) भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणाऱ्या दळणवळण मार्गिकेसारख्या (कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर) ठोस पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सात औद्याोगिक राष्ट्रांच्या समूहाने ‘जी-७’ शिखर परिषदेत सांगितले.

दक्षिण इटलीतील अपुलिया शहरात ‘जी-७’ परिषद आयोजित केली असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विशेष निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत उपस्थित राहिले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर’बाबत चर्चा झाली. गेल्या वर्षी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी ‘कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर’ची घोषणा केली होती. जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला चालना देणारे उपक्रम, प्रमुख प्रकल्प विकसित करण्यासाठी पूरक उपक्रमांना प्रोत्साहन देऊ, असे ‘जी-७’ राष्ट्रांनी नमूद केले.

हेही वाचा >>> “इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट पण धुमसत्या मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; शरद पवार गटाचा हल्लाबोल

आयएमईसीकॉरिडॉर काय आहे?

●भारत-पश्चिम आशिया-युरोप दळणवळण मार्गिका (आयएमईसी) प्रकल्प व्यापारासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने राबवण्यात येणार आहे.

●या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वेमार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

●प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिका अशा महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे.

●सध्या चीन ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ तसेच ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ हे दोन प्रकल्प राबवत आहे. चीनच्या या प्रयत्नांना उत्तर म्हणून ‘आयएमईसी’ कॉरिडॉरकडे पाहिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इटलीतील ‘जी-७’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.इटलीतील ‘जी-७’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.