दक्षिण कोरियातील संगीतज्ञ पीएसवाय यांच्या गंगनम स्टाइल या यू टय़ूब व्हिडिओने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असून या व्हिडिओला ८०.५ कोटी हिट्स मिळाले आहेत. १५ जुलैला ही व्हिडिओ यू टय़ूबवर आली. तिने फेब्रुवारी २०१० मध्ये आलेल्या बायबर यांच्या बेबी या व्हिडिओला मागे टाकले आहे. बेबीला ८०.३ कोटी इतक्या हिट्स मिळाल्या आहेत. पीएसवाय यांच्या दुसऱ्या एका अश्वाधिष्ठित नृत्याने विक्रम केला असून त्याला ५३ लाख हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, पीएसवाय व बायबर हे एकत्र येऊन काही कलाकृती सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीएसवाय यांनी स्वत: नुकताच बायबर यांना दूरध्वनी केला त्यावेळी दोघांनी एकमेकांना दाद दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
पीएसवायची गंगनम व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर
दक्षिण कोरियातील संगीतज्ञ पीएसवाय यांच्या गंगनम स्टाइल या यू टय़ूब व्हिडिओने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असून या व्हिडिओला ८०.५ कोटी हिट्स मिळाले आहेत.
First published on: 26-11-2012 at 12:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaganam songs first on youtube