scorecardresearch

गुजरातमध्ये लघुशंका करण्यासाठी मिळणार एक रूपया!

लोकांना स्वच्छतागृहात जाऊन लघवी करण्याची सवय लागावी यासाठी गुजरातमध्ये प्रशासनातर्फे एक अनोखा उपाय अमलात आणला जाणार आहे.

गुजरातमध्ये लघुशंका करण्यासाठी मिळणार एक रूपया!

लोकांना स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करण्याची सवय लागावी यासाठी गुजरातमध्ये प्रशासनातर्फे एक अनोखा उपाय अमलात आणला जाणार आहे. एरवी अनेक लोक रस्त्याच्या कडेला अथवा आडोशाला लघुशंका करताना दिसतात. यावर उपाय म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेने जवळच्या स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करणाऱ्याला एक रूपयाचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे. यापूर्वी नेपाळमधील काठमांडू येथे अशाप्रकारची प्रयोग करण्यात आला होता आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला होता. त्यामुळेच अहमदाबाद महानगरपालिकेने शहराच्या काही भागांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने शहरातील ६७ ठिकाणे निश्चित केली आहेत. स्वच्छतेच्यादृष्टीने कुप्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणांजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असेल. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण अहमदाबाद शहरात ती राबविण्याचा पालिकेचा मानस आहे.
सार्वजनिक मुतारी/शौचालयांचा वापर व्हावा, जेणेकरून अस्वच्छता पसरणार नाही. तसेच शहर राखण्यासाठी हा प्रयोग राबवत असल्याची माहिती महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या स्वच्छतगृहांतील जाहिरातींद्वारे निधी जमा केला जाईल आणि तो या स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्यांना प्रत्येकी एक रुपये याप्रमाणे दिला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदाबादेत सुमारे ३०० सार्वजनिक शौचालये आहेत. यापैकी ६७ शौचालयात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यातील बहुतेक शौचालये ही झोपड्यांच्या परिसरातील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2015 at 06:44 IST

संबंधित बातम्या