लैंगिक संक्रमित रोगांबाबत सामान्य नागरिक जागरूक होत असल्याने कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत जागतिक बाजारपेठेत कंडोमचा व्यापार अब्जावधीत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक तंत्रज्ञान संशोधन आणि सल्लागार फर्म टेक्नॅव्हिओने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
लैंगिक संक्रमित रोगांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे. त्यामुळे कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच नवनवीन ब्रॅंडची कंडोम बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत हा व्यापार ३.७ अब्ज युएस डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे टेक्नॅव्हिओने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच यापैकी ४० ते ४५ टक्के व्यापार हा भारतासह चीन, जपान सारख्या प्रमुख बाजारपेठेतून होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे कंडोम उत्पादन कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्या उत्पादनाच्या धोरणांवर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच या कंपन्यांनी त्यांची उत्पादनाचे पॅकेजिंग देखील आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहूना तो अधिक कसा आकर्षक करता येईल, यावर कंपन्याचा भर आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार कंडोमचे उत्पादन करणे आणि आकर्षकपणे त्याचे पॅकेजिंग करणे यामुळेही कंडोमच्या विक्रीत वाढ होईल, असेही या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा – Photos : समुद्रकिनारी मौनीचं टॉपलेस फोटोशूट; चाहत्यांकडून बोल्ड फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव