करोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
मोदींच्या लोकप्रियतेलाही बसला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच ग्राफ ५० टक्क्यांच्या खाली
जून महिन्यात मोदींचं गुणांकन ६३ टक्के इतकं होतं. मात्र यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकलं असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आली आहे.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
Modi: 66%
Draghi: 65%
López Obrador: 63%
Morrison: 54%
Merkel: 53%
Biden: 53%
Trudeau: 48%
Johnson: 44%
Moon: 37%
Sánchez: 36%
Bolsonaro: 35%
Macron: 35%
Suga: 29%*Updated 6/17/21 pic.twitter.com/FvCSODtIxa
— Morning Consult (@MorningConsult) June 17, 2021
या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवलं आहे.
Coronavirus: सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?; मोदींना मिळाली ९० टक्के मतं
यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ६६ टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ५३ टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत.
२०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हे गुणांकन ८२ टक्के होतं.
मोदींच्या तुलनेत इतर नेत्यांचं गुणांकन
मारियो ड्रॅगी (इटली) – ६५ टक्के
एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (मेक्सिको) – ६३ टक्के
स्कॉट मॉरिसन (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के
अँजेला मार्कल (जर्मनी) – ५३ टक्के
जो बायडन (अमेरिका) – ५३ टक्के
जस्टिन ट्रूडो (कॅनडा) – ४८ टक्के
बोरिस जॉन्सन (युके) – ४४ टक्के
मून जे-इन (दक्षिण कोरिया) – ३७ टक्के
पेड्रो सांचेज़ (स्पेन) – ३६ टक्के
जायर बोल्सोनारो (ब्राझील) – ३५ टक्के
इमैनुएल मॅक्रॉन (फ्रान्स) — ३५ टक्के
योशीहिदे सुगा (जपान) – २९ टक्के