अभिनेता हृतिक रोशनची पूर्वपत्नी आणि इंटेरियर डिझायनर सुझान खान हिच्याविरोधात गोवा पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुझानविरुद्ध शनिवारी तक्रार करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिलीयं.
एम्जी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट कंपनीने सुझानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काम मिळवण्यासाठी सुझानने आपल्याकडे इंटेरियर डिझायनर असल्याचा दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तिला कामासाठी २०१३ साली १.८७ कोटींचे मानधनही देण्यात आले होते. परंतु, सुझानने केलेले काम हे तिने घेतलेल्या मानधनाच्या प्रतीचे नव्हते, असे कंपनीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीने सुझानला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरमधील तिचा नोंदणी क्रमांक देण्यास सांगितला होता. मात्र, तिने आपला नोंदणी क्रमांक कंपनीला दिलाच नाही. त्यावर कंपनीने यासंबंधीची पडताळणी केली असता सुझान ही नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीने सुझानविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केल्याचे कळते.
पोलीस उपनिरीक्षक रश्मी भैडकर यांनी कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत सुझानविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa designer sussanne khan booked for allegedly cheating real estate firm
First published on: 19-06-2016 at 14:58 IST