सहकारी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तेहेलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर सोमवारी गोवा पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहे. मुख्य अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
तेजपाल यांनी पणजीमध्ये झालेल्या तेहेलकाच्या एका कार्यक्रमादरम्यान या महिलेचे लिफ्टमध्ये लैंगिक शोषण केले होते. गोवा पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी या प्रकरणी तेजपाल यांना अटक केली. सध्या तेजपाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, त्यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. आरोपपत्रामध्ये तेजपाल यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले आहे याची माहिती देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.