८ मार्चच्या महिलादिनानिमित्त गुगल सर्च इंजिनने ६ कोटी रुपये महिलांसाठी देण्याचे ठरवले आहे. नासकॉम-१०००० सह जागृती यात्रा या दोन संस्थांसह एकूण ४० संस्थांना हे पैसे दिले जाणार असून महिलांनी तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे यावे हा या उपक्रमाचा हेतू असून त्याचे नामकरण फॉरवर्ड-४० असे करण्यात आले आहे.
गुगल फॉर  आंत्रप्रेन्युअर्सअंतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यात जास्तीतजास्त महिला उद्योजक तयार होणे अपेक्षित आहे. गुगल १० लाख डॉलर म्हणजे ६ कोटी रुपये या संस्थांनी देणार असून त्यांना तंत्रज्ञान समुदायात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे आव्हान देण्यात आले आहे. कामात व्यस्त असणाऱ्या माता किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मुली या तंत्रज्ञान उद्योजक बनू शकतात व हा कार्यक्रम आमच्या या ४० संस्था लवकरच सुरू करतील असे गुगलने म्हटले आहे.
निवड केलेल्या संस्थांत १८७१ अमेरिकन अँडरग्राऊंड अँड गॅल्वनाइज, कॅम्पस फॉर मॉम्स (इस्रायल), क्लब किडआंत्रप्रेन्युअर (ऑस्ट्रेलिया) सीसी हब (नायजेरिया)जागृती यात्राव नासकॉम  १०००० स्टार्टअपस (भारत), आऊटबॉक्स (युगांडा) यांचा त्यात समावेश आहे.
चांगल्या महिला उद्योजकांना घडवतील अशी आशा गुगल ग्लोबल आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजर ब्रिगेट सेक्सटन बिम यांनी म्हटले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ विमेन बिझीनेस ओनर्सच्या माहितीनुसार अमेरिकेत तीस टक्के महिला उद्योजक असून त्यांनी ७८ लाख लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. महिला उद्योजक कमी भांडवलात उद्योग चालवतात व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा वाटा १२ टक्के आहे.