आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक भारतरत्न पंडीत रविशंकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ने ‘डुडल’च्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. या निमित्त गुगल सर्च इंजिनवर एका उभ्या ठेवलेल्या सतारसोबत वेलीच्या साह्याने गुगल हे अक्षर लिहिण्यात आले आहे. त्यावर कर्सर नेल्यावर पंडीत रविशंकर यांचा ९६ वा वाढदिवस असे वाक्य इंग्रजीत दिसते. अनेक नेटिझन्सनी या डुडलचे स्वागत केले असून, सोशल मीडियावरही त्याबद्दल चर्चा सुरू आहे.
पंडीत रविशंकर यांचे २०१२ मध्ये अमेरिकेत निधन झाले. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी सतारसाठीच समर्पित केले होते. त्यांनी १९४९ ते १९५६ या काळात रेडिओसाठी संगीतकार म्हणूनही काम केले. युरोप, अमेरिकेमध्ये त्यांनी सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. त्याचबरोबर जगातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल व्याख्यानेही दिली होती. भारतातही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यांच्यामुळे अनेकजण सतार वादनाकडे आकर्षित झाले.
१९९९ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. तत्पूर्वी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ याही सन्मानाने गौरविण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘डुडल’च्या माध्यमातून पंडीत रविशंकर यांना ‘गुगल’ची मानवंदना
अनेक नेटिझन्सनी या डुडलचे स्वागत केले आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 07-04-2016 at 12:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle marks 96th birthday of legendary musician pandit ravi shankar