अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा आहे. सोशल नेटवर्किंगवर रविवार संध्याकाळपासूनच ट्रम्प यांच्या आगमनाविषयी ट्रेण्ड व्हायरल होताना दिसले. #TrumpIndiaVisit, #TrumpInIndia, #IndiaWelcomesTrump आणि #Ahmedabad हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसले. मात्र त्याच वेळी नेटकऱ्यांची ट्रम्प यांच्याबद्दलची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटवर ट्रम्प यांची पत्नी, मुलगी कोण आहे यासंदर्भात अनेकांनी सर्च केल्याचे दिसत आहे. मात्र त्याच वेळी या दौऱ्याचा उत्सुकता अमेरिकन नागरिकांमध्येही आहे. मात्र तेथील नागरिकांनी भारताविषयी केलेल्या सर्च टॉपिक संदर्भात जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

भारतीयांनी काय सर्च केलं?

ट्रम्प हे आपल्या कुटुंबाबरोबर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येण्याच्या आदल्या दिवसापासूनच भारतामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय आहे?, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय आहे?, इवांकाचे वय किती आहे?, POTUS म्हणजे काय?, मेलेनियाचे वय किती आहे?, डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती आहे? असे प्रश्न सर्च केल्याचे दिसून आले. यावरुनच भारतीयांना ट्रम्प यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता असल्याचे दिसून आलं.

अमेरिकन जनतेनं काय सर्च केलं?

एकीकडे भारतीयांनी ट्रम्प यांच्या पत्नीबद्दल आणि मुलीबद्दल सर्वाधिक सर्च केल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे अमेरिकन जनतेने अगदी साधे प्रश्न सर्च केल्याचं दिसून येत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ट्रम्प भारत दौऱ्यावर आल्यानंतर अमेरिकेतून where is India? म्हणजेच भारत नक्की कुठे आहे? या प्रश्नासंदर्भात सर्च वाढल्याचे दिसून आलं आहे. इतकचं नाही तर धक्कादायक बाब म्हणजे what is India? म्हणजेच भारत काय आहे? हा प्रश्नही अनेकांनी सर्च केल्याचे दिसून आलं आहे. या दोन्ही प्रश्नांसंदर्भातील सर्च रिझल्ट २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी वाढल्याचे चित्र दिसलं. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार २३ फेब्रुवारी रोजी ट्रम्प अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आणि २४ फेब्रुवारीला भारतात त्यांनी आपले भाषण दिलं.

कुठे आहे भारतसंदर्भातील सर्च

काय आहे भारतसंदर्भातील सर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच वॉशिंग्टन डीसीमधून भारत कुठे आहे आणि काय आहे हे प्रश्न सर्वाधिक वेळा सर्च झाले. त्या खालोखाल न्यू जर्सी, कोलंबिया जिल्हा, जॉर्जिया आणि इंडियाना प्रदेशातून भारताबद्दल सर्च केल्याचे दिसून आलं.

अमेरिकेतील जनतेला भुगोलाबद्दल जास्त ठाऊक नसतं असं म्हटलं जातं. हेच या गुगल सर्चच्या रिझल्टवरुन दिसून येतं.