गुगलनं मला दोन वेळा नाकारलं आणि फ्लिपकार्टचा जन्म झाला अशी गमतीशीर माहिती फ्लिपकार्टचा सहसंस्थापक बिनी बन्सल यानं दिली आहे. बेंगळुरमध्ये एका कार्यक्रमामध्ये मनमोकळ्या गप्पा मारताना खेळीमेळीच्या वातावरणात आत्तापर्यंत अज्ञात असलेल्या गोष्टी बन्सल यांनी शेअर केल्या आणि सहभागींशी हास्य विनोद करत गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाइन शॉपिंगमध्ये अग्रणी भारतीय कंपनी झालेल्या फ्लिपकार्टनं भारतात इतिहास घडवला. बिनी बन्सल व सचिन बन्सल या सहसंस्थापकांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बड्या स्पर्धकांना टक्कर दिली आणि फ्लिपकार्ट ही कंपनी नावारूपाला आणली. सध्या व्यवसायात असलेल्या आव्हानाबद्दल बोलताना बन्सल यांनी मिश्किलपणे सांगितले की बिग बास्केटमधून फळं व भाज्या न मागवता फ्लिपकार्टवरून मागवण्यासाठी पत्नीला कसं मनवायचं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. “रोज असं होतं की पत्नी ऑनलाइन जाते आणि बिग बास्केटवरून खरेदी करते. मी तिला सांगतो की अगं एकदा तरी तू आपल्या ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी करून बघ. परंतु अजून तरी मी तिला यासाठी पटवण्यात यशस्वी झालेलो नाही,” प्रांजळपणे बन्सल सांगतात. ग्राहकांबद्दल नीट माहिती घेता यावी म्हणून बन्सल बंधुंनी स्वत: ग्राहकांच्या दारी जाऊन सामान पोचवलं आहे. काही जणांनी आम्हाला ओळखलंच नाही आणि डिलीव्हरी बॉयशी वागतात तसे वागले, पण काहींनी ओळखले आणि त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतल्याची आठवण बन्सल यांनी सांगितली.

एक हास्यास्पद घटना सांगताना बन्सल म्हणाले, “एका डिलीव्हरीच्या वेळी मला ग्राहकांनी ओळखलं. त्यानंतर ते मला सोडायलाच तयार होईनात. घरी आलेल्या पाहुण्यासारखी राजेशाही त्यांनी मला वागणूक दिली. पण संपूर्ण कुटुंबच माझ्यावर चहा आणि मिठाईचं मारा करत राहिलं,” हे सांगताना पण काय करणार ग्राहक हा शेवटी राजा असतो त्यामुळं मी ते सगळं सहन केलं असं बन्सल यांनी सांगितलं. आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेतलेल्या बन्सल यांनी शाळेत असताना माझं खेळावर जास्ती प्रेम होतं आणि अभ्यासात मी बेताचाच होतो हे प्रांजळपणे सांगितलं. तसंच आपण आयआयटी मध्ये जाऊ ही कल्पनाच एकूणातच आश्चर्यकारक होती असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google twice rejected job to co founder of flipkart binni bansal
First published on: 10-08-2018 at 13:52 IST