वस्तू आणि सेवाकरातून सॅनिटरी पॅड, राखी करमुक्त, १७ उत्पादनांसाठी करकपात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध स्त्रीसंघटनांकडून सातत्याने सुरू असलेली मागणी मान्य करीत वस्तू आणि सेवाकर मंडळाने शनिवारी सॅनिटरी पॅड पूर्ण करमुक्त केले. त्याचबरोबर बहिणीकडून बांधल्या जात असलेल्या राख्यांनाही पूर्ण करमाफी देण्यात आली आहे. मध्यमवर्गाच्या वापरातील दूरचित्रवाणी, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी १७ उत्पादनांनाही मोठी करसूट देण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटीच्या करभारातून मध्यमवर्गाची मोठय़ा प्रमाणात सुटका झाली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. याआधी सॅनिटरी पॅडवर १२ टक्के वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होता. राख्यांप्रमाणेच लघु हस्तकला उत्पादनांनाही ‘जीएसटी’मधून वगळण्यात आले आहे. इथेनॉलवरील जीएसटी पाच टक्क्य़ांवर आणण्यात आला आहे.

रंग, ६८ इंचापर्यंतचे छोटे दूरचित्रवाणी संच,  वॉशिंग मशिन, पाणी तापवणारे हीटर, इस्त्री, फ्रिज, हेअर ड्रायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स तसेच मिक्सर, ज्यूसर आदी १७ उपकरणांवरील जीएसटी २८ टक्क्य़ांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. मोबाइल, लॅपटॉप, विद्युत मोटारगाडय़ा, विद्युत दुचाकी आदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीवरील जीएसटीही कमी करण्यात आला आहे.

याआधी ५०० रुपयांपर्यंतच्या पादत्राणांवर पाच टक्के जीएसटी लागू होता. आता ही मर्यादा एक हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.

वर्गीकरणातील भेदामुळे ओढवलेले वादंग टाळण्यासाठी कोटा दगड, वालुकाश्म आणि त्यासारख्या प्रांतिक ख्याती लाभलेल्या दगडांवरील जीएसटीदेखील १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.

जीएसटी मंडळाची पुढील बैठक आता ४ ऑगस्टला होणार आहे.

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन स्वस्त होणार..

रंग, ६८ इंचापर्यंतचे छोटे दूरचित्रवाणी संच,  वॉशिंग मशिन, पाणी तापवणारे हीटर, इस्त्री, फ्रिज, हेअर ड्रायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स तसेच मिक्सर, ज्यूसर आदी १७ उपकरणांवरील जीएसटी २८ टक्क्य़ांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

मोबाइल, लॅपटॉप विद्युत वाहनांना दिलासा..

मोबाइल, लॅपटॉप, विद्युत मोटारगाडय़ा, विद्युत दुचाकी आदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीवरील जीएसटीही कमी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst council cuts rates
First published on: 22-07-2018 at 01:08 IST