GSEB class 10 SSC results 2017: गुजरात राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल उद्या (सोमवार) सकाळी ८ वाजता जाहीर होणार आहे. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GSHSEB) gseb.org आणि examresults.nic.in या वेबसाइटवर निकाल जाहीर करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दि. १५ मार्च ते २५ मार्च २०१७ दरम्यान या परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यातून ११,०२,६२५ विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे यंदा तुरूंगातून १४२ जणांनी परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खाली पद्धतीचा वापर करावा:

Step 1: मंडळाने दिलेल्या वेबसाइटवर जावे (बातमीत वेबसाइट दिली आहे)

Step 2: वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन दहावीचा निकाल या नोटिफिकेशनवर क्लीक करावे

Step 3: नंतर तुमची माहिती भरून (परीक्षा क्रमांक) ती सबमीट करावी.

Step 4: निकाल डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी.

वर्ष २०१६ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी ५.५ लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील ८२८४ विद्यार्थ्यांनी ९९ टक्के प्राप्त केले होते. गतवर्षी ६७.०६ टक्के विद्यार्थी परीक्षेस बसले होते. वर्ष २०१५ पेक्षा यात ५.५ टक्क्यांची वाढ झाली होती. मुलींनी प्रत्येकवेळी या निकालात आपले वर्चस्व राखले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat board gseb class 10 ssc results 2017 to release at gseb org
First published on: 28-05-2017 at 23:19 IST