scorecardresearch

गुजरात काँग्रेसचे एप्रिलमध्ये ३०० पेक्षा जास्त मेळावे; राहुल गांधींना आमंत्रण  

हे मेळावे ६ एप्रिल ते १२ एप्रिल आणि १५ एप्रिल ते २५ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये २५१ तालुके, ३३ जिल्हे आणि आठ महानगरांमध्ये आयोजित केले जातील.

gujarat congress
गुजरात काँग्रेसच्या मेळाव्यात राहुल गांधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ( Image – लोकसत्ता टीम )

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसने एप्रिल महिन्यात ३०० पेक्षा जास्त मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पक्षाचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. भाजप सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी सांगितले. हे मेळावे ६ एप्रिल ते १२ एप्रिल आणि १५ एप्रिल ते २५ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये २५१ तालुके, ३३ जिल्हे आणि आठ महानगरांमध्ये आयोजित केले जातील. राहुल गांधी यांना २० एप्रिल ते २५ एप्रिल यादरम्यान आमंत्रित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 02:25 IST

संबंधित बातम्या