गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी टीका केली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये विकासकामांमुळेच विजय झाला असा दावा केला आहे. जीता विकास, जीता गुजरात असे ट्विट मोदींनी केले असून या विजयाचे श्रेय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा विजय झाला असून या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. हिमाचल प्रदेशमध्ये ‘कमळ’ बहरले, तिथेही विकासाचा विजय झाला, असे त्यांनी म्हटले आहे. हिमाचल आणि गुजरातमधील निकालावरुन जनतेने सुशासन आणि विकासाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होते. या दोन्ही राज्यांमध्ये मेहनत करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाला, असे त्यांनी सांगितले. भाजपवर विश्वास दाखवणाऱ्या दोन्ही राज्यांमधील जनतेचा मी आभारी आहे, दोन्ही राज्यांचा विकास आणि सेवा करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील या निकालावर प्रतिक्रिया दिली. गुजरातमध्ये घराणेशाहीचा पराभव झाला आणि विकासाला लोकांनी मतदान दिले असे अमित शहा यांनी म्हटले आहे. आहे. विकास वेडा झाला आहे म्हणत आमच्या धोरणाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र गुजरात आणि हिमाचलच्या जनतेने काँग्रेसला उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.